विशेष बातम्या

आत्ता बांधकाम कामगारांना मिळणार आर्थिक सहाय्य

Construction workers will get financial assistance now


By nisha patil - 5/27/2023 4:49:34 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार कल्याण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून पाच लाख रुपये तर, नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाखांपर्यंत मदत केली जाते. जिल्ह्यातील अनेक बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. बांधकाम कामगारांना याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागतो .या नोंदणीसाठी बांधकाम कामगार असल्याचा दाखला, ओळख पत्र आणि वयाच्या पुरावाचा दाखला, रहिवासी दाखला ,पासपोर्ट आकाराचे तीन फोटो अशी कागदपत्रे जोडावी लागतात.


आत्ता बांधकाम कामगारांना मिळणार आर्थिक सहाय्य