बातम्या

उन्हाळ्यात 'या' प्रकारे करा मधाचे सेवन!

Consume honey this way in summer


By nisha patil - 6/23/2023 7:18:58 AM
Share This News:



निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि आहार दोन्ही खूप महत्वाचे आहेत. त्याचबरोबर उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे.

अशावेळी जर तुम्ही मधाचं सेवन केलं तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. उन्हाळ्याच्या ऋतूत मधाचे सेवन कसे करावे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. कारण जर तुम्ही शरीर निरोगी ठेवलं नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

उन्हाळ्यात ‘या’ प्रकारे करा मधाचे सेवन

1. ताकामध्ये मिसळून प्या

उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. अशावेळी जर तुम्हाला तुमचं शरीर हायड्रेटेड आणि थंड ठेवायचं असेल तर तुम्ही ताकामध्ये मध मिसळून पिऊ शकता. असं केल्याने तुमचं ताकही थोडं गोड होईल आणि त्याचा तुम्हाला फायदाही होईल. ताकमध्ये मध मिसळून प्यायल्याने तुमची स्मरणशक्ती जलद होते आणि तुमचे मन रिलॅक्स राहते.

2. लिंबाच्या पाण्यात मध घाला

लिंबूपाण्यासोबत मधाचे सेवन करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. कारण उन्हाळ्यात लिंबू आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवते तसेच आपल्या पचन समस्यांमध्ये देखील फायदेशीर ठरते. पण लिंबूपाण्यात मध मिसळून प्यायल्यास उन्हाळ्यात उष्णता मिळत नाही आणि शरीराची उष्णताही कमी होते.

3. कोमट पाण्यात मध मिसळा

कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने तुमच्या शरीरात ऊर्जा राहते. हे आपला लठ्ठपणा कमी करण्याचे देखील कार्य करते. त्यामुळे रोज सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यावे.


उन्हाळ्यात 'या' प्रकारे करा मधाचे सेवन!