बातम्या
उन्हाळयात सुपर थंडावा देणारा ताडगोळा सेवन कराच
By nisha patil - 3/16/2024 7:18:14 AM
Share This News:
काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. मराठवाड्यात तर सूर्य आग ओकत आहे. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे. उन्हाळयात काकडी, कलिंगड, नारळपाणी ताक अशा गोष्टींचा आहारात वापर करण्यात येतो. पण उन्हाळयात ताडगोळा देखेल शरीराला थंडावा देतो.
आतून लिचीप्रमाणे असणारे हे फळं उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे. यातून शरीराला आवश्यक मिनरल्स आणि नैसर्गिक शर्करा मिळते. ताडगोळ्याचे काय काय फायदे आहेत जाणून घेऊयात.
शरीर थंड ठेवण्यासाठी उत्तम
ताडगोळ्याचे सेवन हे नैसर्गिकरित्या शरीर थंड ठेवण्याचा मार्ग आहे. उन्हाळ्यात शरीराचं वाढलेलं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताडगोळ्याचं सेवन करावं. ताडगोळ्यामुळे तहानही भागते आणि तात्काळ ऊर्जाही मिळते.डिहायड्रेशन आणि थकवा दूर करते
ताडगोळ्यामध्ये सोडियम आणि पोटॅशिअम हे मिनरल्स असतात. ज्यामुळे शरीरातील फ्ल्युड आणि इलेक्ट्रोलाइटचीतापळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यातील डिहायड्रेशन आणि थकवा या समस्या दूर होतात.
पोटाचे विकार दूर होतात
अनेक पोटाचे आजार आणि पचनसंबंधी समस्यांवर ताडगोळा हा उपचाय आहे. यामुळे मलावरोधाची समस्या दूर होण्यास मदत होते, शौचास स्वच्छ होते. तसंच असिडीटी आणि स्टमक अल्सरपासूनही आराम मिळतो.
त्वचा समस्येवर गुणकारी
उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे घामोळ्यांसारखे इतर त्वचेच्या समस्या निर्माण होतात. ताडगोळ्याच्या सेवनासह ताडगोळा त्वचेच्या समस्या असलेल्या भागावर लावल्यासही आराम मिळतो.
कमी कॅलरीयुक्त फळ
ताडगोळा हे कमी कॅलरीयुक्त फळ आहे. यातील पाणी तुम्हाला पोट भरल्याचं समाधान देत आणि त्यामुळे जास्त खाणं होत नाही परिणामी वजन घटतं.
उन्हाळयात सुपर थंडावा देणारा ताडगोळा सेवन कराच
|