बातम्या

देखभाल दुरुस्ती कालावधीतील ठेकेदार कृष्णा खाडे एक वर्षासाठी ब्लॅकलिस्ट

Contractor Krishna Khade blacklisted for one year during maintenance repair period


By nisha patil - 10/31/2024 4:15:58 PM
Share This News:



  विभागीय कार्यालय क्र.1अंतर्गत रचनाकार हौसिंग सोसायटी येथील देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्याचा ठेकेदार कृष्णा खाडे याला एक वर्षासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी ब्लॅकलिस्ट केलंय.या ठेकेदाराने महापालिकेची नोटीस न स्विकारणे, महापालिकेस कामाबाबत प्रतिसाद न देणे, रस्ते सुस्थित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आलीय. शहरातील देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी आयुक्त कायालयात आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, आर के पाटील, महादेव फुलारी, रमेश कांबळे आदि उपस्थित होते.

यावेळी प्रशासकांनी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत काढण्यात आलेल्या नोटीसा व केलेल्या कार्यवाहीची माहिती सर्व उप-शहर अभियंता यांच्याकडून घेतली. यामध्ये सर्व विभागीय कार्यालय अंतर्गत खराब रस्त्यांच्या कामाबाबत नोटीसा काढण्यात आल्या असून देखभाल दुरुस्ती कालावधीतील ठेकेदारांना ब्लॅकलिस्टचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर आतापर्यंत वारंवार सूचना देऊनही सर्व रस्ते दुरुस्त करुन घेतले नसल्याने उप-शहर अभियंता महादेव फुलारी व रमेश कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्या. तसच विभागीय कार्यालय क्र.1 ला पॅचवर्कसाठी दिलेला निधीतील कामे अजूनही पुर्ण झाली नसल्याने प्रशासकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जी कामे बरेच दिवस झाले मंजूर करुन आचारसंहितेपुर्वी वर्क ऑर्डर दिलेली नाहीत अशा कामांची फाईल कोठे कोठे प्रलंबीत आहेत याची तपासणी करुन ज्या कनिष्ठ लिपीक, कनिष्ठ अभियंता, उप-शहर अभियंता व शहर अभियंता यांचेकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्या. पाऊस थांबल्याने तातडीने गर्दीच्या ठिकाणांचे रस्ते पुर्ण करुन घ्या. विभागीय क्षेत्रीय अधिकारी उपआयुक्त व सहा.आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात प्राधान्याने कामे करुन घ्यावीत अशा सूचना के.मंजुलक्ष्मी यांनी केल्या.


देखभाल दुरुस्ती कालावधीतील ठेकेदार कृष्णा खाडे एक वर्षासाठी ब्लॅकलिस्ट