बातम्या
संजय घोडावत विद्यापीठाचा 29 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ एआयसीटीचे माजी अध्यक्ष डॉ.शंकर मंथा प्रमुख पाहुणे..
By nisha patil - 2/18/2024 1:07:30 PM
Share This News:
कोल्हापूर:- संजय घोडावत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ गुरुवार 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा.घोडावत विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय तंत्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.शंकर मंथा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर चेअरमन संजय घोडावत अध्यक्षस्थानी असतील,अशी माहिती कुलगुरू प्रो.उद्धव भोसले यांनी दिली.
यावेळी एकूण 882 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे यामध्ये पदवी 568, पदव्युत्तर 247, डिप्लोमा 59,
पीएचडी पदवी 2 व 9 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येणार आहेत.या प्रसंगी विशेष प्राविण्य प्राप्त एका विद्यार्थ्याला प्रेसिडेंट पुरस्कार व अकॅडमी टॉपर एका विद्यार्थ्याचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमामध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांला विशेष पदक आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ.एन.के.पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी केले आहे.
संजय घोडावत विद्यापीठाचा 29 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ एआयसीटीचे माजी अध्यक्ष डॉ.शंकर मंथा प्रमुख पाहुणे..
|