बातम्या

विकास कामांच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Coordinate with local public representatives in planning development works


By nisha patil - 3/2/2025 1:04:05 PM
Share This News:



विकास कामांच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 जिल्हास्तरावरून अनेक विकासकामांचे नियोजन होते, त्याला मंजुरी दिली जाते. निधीही वर्ग केला जातो. या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील आमदार व खासदार यांच्याशी समन्वय ठेवून योजनांना मंजुरी द्या. त्यांनी दिलेल्या सूचना प्राधान्याने त्या त्या योजनेत समाविष्ट करा अशा  सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. तसेच कोणतेही नवीन कामांचे प्रस्तावही सादर करताना ते संबंधित लोकप्रतिनिधींना माहित असावेत. आरोग्य व शिक्षण हे दोन घटक विकास प्रक्रियेला बळ देणारे आहेत. सुदृढ व शिक्ष‍ित समाज निर्माण करण्यासाठी या दोन घटकांना अधिकचा निधी येत्या काळात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शाळांबाबत जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रही येत्या काळात आधुनिक होत आहेत. समृद्ध शाळा व समृद्ध अंगणवाडी हा उपक्रम येत्या पाच वर्षात जिल्ह्यात राबविण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच शहरातील 100 वर्षांहून अधिक जुन्या शाळांबाबतही सीएसआर व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 कोल्हापूरच्या विकासातील महत्त्वाचे घटक यात श्री करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखडा, श्री जोतिबा विकास आराखडा, कन्व्हेंशन सेंटर आदी महत्त्वाच्या विषयांबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक लावून सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी पुढिल काळात प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावरील अधिकचा निधी कसा आणता येईल याबाबतही चांगले नियोजन केले जाईल असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 


विकास कामांच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Total Views: 44