बातम्या

शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न; मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकानी सोहळ्याचा थरार रंगला

Coronation ceremony on behalf of Shiv Sena concluded with enthusiasm


By nisha patil - 6/6/2024 9:48:25 PM
Share This News:



कोल्हापूर दि.०६: छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामगिरीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली, यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्वस्त केले. शिवराज्याभिषेक सोहळा हा तमाम शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ.शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर  यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होऊन छ.शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीने छ. शिवरायाना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना साखर – पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांच्या थरारांनी राज्याभिषेक सोहळ्यात रंगत आणली.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, रमेश खाडे, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, समन्वयक श्रीमती पूजा भोर, शहरप्रमुख सौ.अमरजा पाटील, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.पूजा भोर, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, अल्पसंख्याक सेलचे रियाज बागवान, उपशहरप्रमुख कपिल केसरकर, सचिन पाटील, अंकुश निपाणीकर, सुरेश माने, सम्राट यादव, मुकुंद सावंत, राजू कदम, युवासेनेचे अविनाश कामते, मंदार पाटील, शैलेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, शहाजी तरुण मंडळाचे उदय शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न; मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकानी सोहळ्याचा थरार रंगला