बातम्या

सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत, फायदे

Correct Method of Surya Namaskar


By nisha patil - 8/9/2023 7:46:55 AM
Share This News:



सूर्य हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. या कारणामुळे तर प्राचीन कालात ऋषी-मुनी सूर्याची पूजा-अर्चना करत होते. सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याला नमस्कार करणे होय. यालाच सन सेल्यूटेशन (Sun Salutation) असे म्हटले जाते. जर तुम्ही योगासने करण्यास सुरुवात करत असाल तर यासाठी 'सूर्य नमस्कार' हा योगा प्रकार सर्वोत्तम आहे. यामुळे तुम्हाला एकाच वेळी 12 योगासनांचा फायदा होतो, आणि म्हणूनच याला सर्वोत्तम योगासन असेही म्हटले जाते.  

योगाभ्यास आणि शारीरिक हालचाल केवळ शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक नाही तर मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. सूर्यनमस्काराच्या 12 योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने तुमचे मन  सक्रिय आणि एकाग्र होते. सूर्यनमस्कार हे सकाळी रिकाम्या पोटी केले जातात. हे सहसा सकाळी रिकाम्या पोटी केले जाते. हे सकाळी मोकळ्या जागेत करा, जिथे तुम्हाला ताजी हवा मिळेल.सूर्यनमस्कार करण्याचे फायदे काय आहेत ? (Health Benefits of Surya Namaskar)2
1. वजन कमी करण्यात मदत करते.

2. पचन आणि भूक सुधारते.

3. शरीर लवचिक बनवते.

4. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात प्रभावी.

5. शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते.

6.  शरीराची स्थिती सुधारते आणि  शरीरात योग्य  संतुलन निर्माण करण्यास मदत होते.

7.  स्नायूंना टोन करते आणि हाडे मजबूत करते.

8.  हात, खांदे, कंबर, पाय, क्वाड्स, आणि नितंब यांच्या स्नायूंना टोन करते.


सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत, फायदे