बातम्या

श्री अंबाबाई मंदिरातील दानपेठ यांची मोजदाद सुरू

Counting of Danpeth in Shree Ambabai Temple begins


By nisha patil - 11/7/2023 4:50:07 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : विनोद शिंगे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरातील दानपेटीतील दान रक्कम मोजण्यास सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी पेटी क्रमांक चार आणि पेटी क्रमांक पाच ची मोजणी करण्यात आली यामध्ये पेटी क्रमांक चार मध्ये 18 लाख 16 हजार 767 रुपये तर पेटी क्रमांक पाच मधून 17 लाख 51 हजार 910 रुपये अशी एकूण 35 लाख 68 हजार 677 रुपयांची मोजणी करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गरडमनपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांच्या देखरेखीखाली ही मोजणी सुरू आहे.


श्री अंबाबाई मंदिरातील दानपेठ यांची मोजदाद सुरू