बातम्या

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दानपेटी ची मोजदाद सुरू

Counting of donation box in Ambabai temple in Kolhapur is going on


By nisha patil - 6/20/2023 5:19:27 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर शहरासह राज्यातील अनेक भाविक करवीर निवसिनी आई  अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांच्याकडून श्रद्धेने आणि सेवेकरिता मंदिरातील विविध कारणासाठी दानपेटीत भरपूर दान करत असतात.सोमवारपासून अंबाबाई देवी मंदिरातील दानपेटी मोजणी सुरु असून पहिल्याच दिवशी दोन पेटीमध्ये सुमारे 35 लाखाहून अधिक रकमेची मोजणी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांसह सीसीटीव्ही च्या देखरेखी खाली ही मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर या मोजणी सुरुवात करण्यात आली आहे. पेटी क्रमांक चार मध्ये 16 लाख 98 हजार 469 रुपये तर, पेटी क्रमांक पाच मध्ये 18 लाख 37 हजार 387 रुपये जमा झाले आहेत.पहिल्याच दिवशी 35 लाख 35 हजार 856 रुपये देवस्थानकडे जमा झाले आहेत.


कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दानपेटी ची मोजदाद सुरू