बातम्या

जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी आठ पासून सुरुवात

Counting of votes of 89 Gram Panchayats in the district started from 8 am


By nisha patil - 6/11/2023 1:42:41 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती आज सकाळी कोल्हापुरातील रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोडाऊनत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला सुरुवातीला मतपत्रिकेंची विभागणी करण्यात आली आणि यानंतर जिल्ह्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला करवीर तालुक्यातील चिंचवड ग्रामपंचायत अपक्षांनी बाजी मारल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला 

जिल्ह्यातल्या 89 ग्रामपंचायतीत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गट ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करण्यात आली होती अपेक्षेप्रमाणे शनिवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि यानंतर गुलाल कोण उधळणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाने प्रतिष्ठेची केलेली चिंचवड ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला धक्कादायक निकालाची नोंद करत चिंचवड ग्रामपंचायत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारत 11 जागांपैकी 10 अपक्ष उमेदवार विजयी झाले यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आकाशबाजी करत जल्लोष साजरा केला


जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी आठ पासून सुरुवात