बातम्या
क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेता अक्षय कुमारउतरणार निवडणुकीच्या रिंगणात ...?
By nisha patil - 2/3/2024 1:13:43 PM
Share This News:
क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेता अक्षय कुमारउतरणार निवडणुकीच्या रिंगणात ...?
नवी दिल्ली : भाजपकडून पहिल्या टप्प्यात तब्बल लोकसभेच्या 130 उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे सांगितले जाते. यामध्ये मोदी-शाहांकडून धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.दिल्लीतील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार आगामी निवडणुकीत भाजप अनेक सेलिब्रिटींना निवडणुकांच्या रिंगणात उतरवू शकते. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याचा समावेश असल्याचे सांगते. युवराज सिंह पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. याशिवाय, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपकडून चंदिगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. तर भाजपच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना दक्षिण भारतामधील एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, अशी माहिती आहे.
क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेता अक्षय कुमारउतरणार निवडणुकीच्या रिंगणात ...?
|