बातम्या

बनावट सोन्यासह गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

Crime against two for selling ganja with fake gold


By nisha patil - 8/8/2023 12:39:50 PM
Share This News:



बनावट सोन्यासह गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

बनावट सोन्याच्या बिस्किटांसह गांजा खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलय त्यांच्याकडून दोन किलो गांजा, बनावट सोन्याची बिस्किटे आणि रोख रक्कम असा चाळीस हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चंदगड येथील कालकुंदरीत राहणारा सागर संभाजी पाटील आणि जळगाव येथील पुष्कर पाखरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे चे कर्मचारी महेश गवळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापशी ते लिंगनूर कडे जाणाऱ्या रोडवर बाळीक्रे गावाजवळ दोन किलो गांजाची देवघेव सुरू असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे सुमारे 30 हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा बनावट सोन्याची बिस्किटे आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळवणारा या दोघा विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


बनावट सोन्यासह गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा