बातम्या
ढोंगी लेकाचे सामानातून टीकास्त्र
By nisha patil - 10/26/2023 7:52:30 PM
Share This News:
ढोंगी लेकाचे सामानातून टीकास्त्र
सामनाच्या अग्रलेखातून मंत्री मुश्रीफांवर टीकेचे बाण...
महाराष्ट्रात ज्यांना उलटे टांगायचं आहे ते मोदी शहाच्या चरणांशी बसून पाद्यपूजा करीत आहेत
भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरोधकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत, नुकत्याच झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी भ्रष्टाचारावरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घनाघाती टीका केली, आता सामनाच्या आजच्या अग्रलेखातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत यामुळे सत्तेत सहभागी होऊन ही मंत्री हसन मुश्रीफ टीकेचे धनी ठरत आहेत...
हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या पैश्याचा अपहार केल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे तरीही मुश्रीफ भाजपपुरुस्कृत मंत्री मंडळात आहेत . अजित पवारांचा शिखर बँक,सिंचन घोटाळा पंतप्रधान मोदी यांनीच उकरून काढला व चौथ्या दिवशी अजित पवारांना दुग्धस्नान घालून अजित पवारांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली भष्ट्राचाराविरुद्ध लढायचे म्हणजे रोज नवीन भष्ट्राचार करून राज्य लुटायचे असेच हे धोरण आहे हे सगळे महात्मा आज भाजप पुरस्कृत राज्य मंत्रिमंडळात आहेत पंतप्रधान मोदी म्हणतात एकही भष्ट्राचाऱ्याला सोडणार नाही ,अमित शहा सांगतात भष्ट्राचाऱ्याला उलटे टांगू ,पण महाराष्ट्रात ज्यांना उलटे टांगायचं आहे ते मोदी शहाच्या चरणांशी बसून पाद्यपूजा करीत आहेत ,ढोंगी लेकाचे
हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्ष्याचे वस्त्रहरण केले आहे मुश्रीफ यांनी कोल्हापूर सांगितले कि हे भाजपवाले मला तुरुंगात टाकायला निघाले होते ,याचा अर्थ असा आहे कि ,ते तुरुंगात टाकायला निघाले पण आज मी त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री आहे
अशा कडक शब्दात हसन मुश्रीफ यांचेवर सामानातून अग्रलेख आज प्रसिद्ध झाला आहे
ढोंगी लेकाचे सामानातून टीकास्त्र
|