बातम्या
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आत जमावबंदी, मात्र 100 मी ची अट शिथिल
By nisha patil - 8/14/2024 4:10:35 PM
Share This News:
शहरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरामध्ये 100 मीटर मध्ये प्रवेश बंदी घालण्याची आवश्यकता नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिनांक 14 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत कोल्हापूर शहरामधील फक्त केशवराव भोसले नाट्यगृहातील परिसरामध्ये, आवारामध्ये कोणत्याही अशासकीय व्यक्तीस प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत आहे. या आपत्ती कालावधीमध्ये अग्निशामक यंत्रणा, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व आपत्ती संदर्भातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या परिसरामध्ये कार्यरत राहून आपत्ती विषयक कामकाज करण्यास मुभा राहील. बाहेरील परिसरात घालण्यात आलेली १०० मी पर्यंतची जमावबंदी अट या आदेशान्वये संपलेली आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी करवीर यांनी दिले आहेत
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आत जमावबंदी, मात्र 100 मी ची अट शिथिल
|