बातम्या

उन्हाळ्यातील आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे

Cucumber must be included in summer diet


By nisha patil - 3/15/2024 7:22:34 AM
Share This News:



सध्या उन्हाळा खुप कडक जाणवतो आहे. या ऋतूत आरोग्याची काळजी घेणे खूप आव्हानात्मक असते. परंतु अनेक फळे आणि भाज्या यावेळी विशेष फायदेशीर ठरू शकतात  काकडी  हे असेच एक आवडते फळ आहे, जे उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते 
काकडीमध्ये फायदेशीर पोषक तत्वे तसेच अनेक वनस्पती-आधारित संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. सॅलडपासून ते ड्रिंक्सपर्यंत, खाण्यापासून ते चेहर्‍यावर लावण्यापर्यंत एकूणच आरोग्यासाठी काकडी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा धोका  जास्त होत असल्याने रोजच्या आहारात काकडीचा समावेश करून तुम्ही ही समस्या टाळू शकतात. काकडीमध्ये कॅलरी कमी असते आणि त्यात जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते. जे हायड्रेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आदर्श बनवते. काकडीमध्ये नैसर्गिकरित्या असलेले गुण हे इतर अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

 

विविध रोगांपासून संरक्षण –
काकडीमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. मुक्त रॅडिकल्समुळे हृदय, फुफ्फुस आणि ऑटोम्यून्यून रोगाचा धोका वाढतो. काकडीचे आरोग्यविषयक फायदे जाणून घेण्यासाठी  केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळले की ३० दिवस त्याचे सेवन केल्याने शरीरात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण सुधारते.

 

उष्माघाताची समस्या  –
काकडीमध्ये असलेल्या पाण्याचे प्रमाण हे डिहायड्रेशनपासून संरक्षण करते. तापमानातील बदलांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी काकडीचे सेवन उपयुक्त ठरू शकते. ४४२ मुलांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांना असं आढळून आलं की, शरीरातील पाण्याचं प्रमाण सुधारण्यासाठी काकडीचं सेवन करणं फायदेशीर ठरत.

मधुमेहात काकडी खाण्याचे फायदे –
काकडीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते
आणि मधुमेहाची गुंतागुंत टाळता येते. प्राणी आणि चाचणी-ट्यूब अभ्यासानुसार असे आढळले आहे
की मधुमेहाच्या समस्येमध्ये काकडीचे सेवन करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
उंदरांवर केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की काकडीच्या सालीचा अर्क रक्तातील साखर नियंत्रित करण्यात फायदेशीर ठरतो.

 

वजन कमी करण्याचे मार्ग  –
काकडीत कॅलरीज कमी असल्याने ती खाल्ल्याने शरीराचे वजन वाढत नाही.
१०० ग्रॅम काकडीमध्ये फक्त १६ कॅलरीज असतात. याचा अर्थ असा आहे की आपण अतिरिक्त कॅलरीशिवाय काकडी खाऊ शकतात.
काकडी कोशिंबीर आणि रायता जेवणाची चव वाढवतो तसेच इतर अनेक फायदे होतात.


उन्हाळ्यातील आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे