बातम्या

सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट चांगलंच चर्चेत .......

Currently Galaxy Apartment in Bandra is very much in discussion


By nisha patil - 4/15/2024 6:00:07 PM
Share This News:



 गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान राहतो. समुद्र किनाऱ्यासमोर असणाऱ्या या अपार्टमेंटच्या गॅलरीतून सलमान खान आपल्या चाहत्यांना भेटत असतो. रविवारी, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या गॅलरीच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये ज्याच्या शब्दाचा मान, आदरयुक्त भीती आहे, ज्याची संपत्ती जवळपास 2900 कोटींच्या घरात आहे, तो सलमान खान वांद्रे येथील वन बीएचके फ्लॅटमध्ये का राहतो असा अनेकांना प्रश्न पडला असेल. त्याचे कारणही सलमानने एकदा सांगितले होते.

ज्यावेळी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावेळी सलमान खान घरीच होता. या घटनेत तो सुखरुप आहे. सलमान खान राहत असलेला गॅलेक्सी अपार्टमेंट हा इतर फिल्म स्टार्सच्या घरांसारखं किंवा बंगल्यासारखे आलिशान नाही. सलमानची इच्छा असेल तर तो कुठेतरी जाऊन राहू शकतो आणि स्वतःचे सुंदर घर बांधू शकतो. पण त्याने तसे केले नाही. सलमान खानने एका कार्यक्रमात आपण गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो, याचे उत्तर दिले होते. आपल्या आई-वडिलांसाठी त्या इमारतीमध्ये राहत असल्याचे सलमानने सांगितले.  2009 मध्ये 'तेरे मेरे बीच में' या फराह खानच्या शोमध्ये सलमानने आपल्या घराबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी त्याला विचारले होते की, तू सुपरस्टार आहेस, कोट्यवधी कमावतोस पण एक बेडरुम हॉलच्या रुममध्ये का राहतो? त्यावेळी सलमानने सांगितले की, खरंतर माझं घर हे तीन बेडरुम किचन आहे. पण, तो वन बीएचके कसा झाला माहित नाही. मी आईसाठी त्याच इमारतीत राहत असल्याचे सलमानने सांगितले. सलमान खान हा गॅलेक्सी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहतो. तर,  आई-वडील पहिल्या मजल्यावर राहतात.


सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट चांगलंच चर्चेत .......