बातम्या

डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी

Curry chutney is beneficial in diabetes


By nisha patil - 3/20/2024 7:24:47 AM
Share This News:



उन्हाळा आला की आपल्या आहारातही बरेच बदल होतात. या ऋतूमध्ये, लोक अशा गोष्टी खाण्यास प्राधान्य देतात, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळेल आणि उष्णतेपासूनही बचाव होईल. याच कारणामुळे लोक उन्हाळ्यात कच्चा आंबा म्हणजेच कैरी खातात. या मोसमात लोकांना कैरीचे  अनेक प्रकारे खायला आवडतात. कैरीचे पन्हे असो की कैरीची चटणी, लोक अगदी आवडीने खातात.

कैरीची चटणी तुमच्या जेवणाची चव वाढवते आणि आरोग्यालाही फायदेशीर ठरते. कैरीच्या चटणीचे फायदे आणि रेसिपी जाणून घेवूया –

1. पोटासाठी लाभदायक
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध, कैरीची चटणी स्वादिष्ट आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात, जी पोटासाठी फायदेशीर आहेत. तसेच यामध्ये आढळणारे एक विशेष प्रकारचे आम्ल आपली पचनसंस्था सुधारते.

2. डायबिटीजमध्ये फायदेशीर
डायबिटीजच्या रुग्णांसाठी कैरीची चटणी वरदानापेक्षा कमी नाही. खरं तर, ती ब्लड शुगर कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये अनेक घटक आढळतात, जे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कैरीची चटणी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण चांगले राहते, जे डायबिटीजमध्ये खूप फायदेशीर ठरते. (Raw Mango Chutney)

3. त्वचेसाठी गुणकारी
कैरीच्या चटणीमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे कैरीची चटणी खाल्ल्याने फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यासोबतच ती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्यात असलेले आयर्न रक्ताची कमतरता दूर करते, ज्यामुळे त्वचा सुधारते.

 

अशी बनवा कैरीची चटणी

साहित्य
– २५० ग्रॅम कैरी
– ६ ते ७ पाकळ्या लसूण
– कोथिंबीर
– पुदीना
– काळेमीठ चवीनुसार
– २ चिमूटभर काळी मिरी पावडर
– दोन चिमूट जिरे पूड
– २ ते ३ हिरव्या मिरच्या

 

कृती
– सर्वप्रथम कैरी सोलून तिचा गाभा वेगळा करा.
– आता लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरवी मिरची आणि कैरी घालून मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या.
– वाटताना हवे असल्यास त्यात ५० मिलीग्राम पाणी देखील घालू शकता.
– हे मिश्रण चांगले बारीक करा.
– बारीक पेस्ट तयार झाल्यावर त्यात काळेमीठ, जिरेपूड, काळी मिरी पावडर मिसळा.
– तयार आहे तुमची कैरीची चटकदार आणि आरोग्यदायी चटणी.


डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी