बातम्या
डी. वाय. पाटील मेडिकल- नर्सिंगचे संघ व्हॉलीबॉलमध्ये विजेते
By nisha patil - 10/16/2023 8:15:16 PM
Share This News:
डी. वाय. पाटील मेडिकल- नर्सिंगचे संघ व्हॉलीबॉलमध्ये विजेते
-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा
कोल्हापूर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आंतर महाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक 14 व 15 ऑक्टोबर 2023 रोजी डी वाय पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत मुलांमध्ये डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघाने तर मुलीमध्ये डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या संघाने विजेतेपद पटकावले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रत्येक स्पर्धेत हार-जीत होतच असते. मात्र, पराभवाने खचून न जाता खेळाचा आनंद घ्यावा. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. खेळांमुळे शरीराबरोबरच मन व बुद्धीचा विकास होतो. त्यामुळे या स्पर्धांचा आनंद घ्या असे आवाहन डॉ. मुदगल यांनी उद्घाटनपर भाषणात केले. यावेळी कुलसचिव डॉ.व्ही व्ही भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ. वेणुगोपाल यांच्यासह सर्व कॉलेजचे स्पोर्ट्स इन्चार्ज उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये मुलांचे आठ संघ व मुलींचे सहा अशा 14 संघांचा सहभाग होता. स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे (मुले) मेडिकल कॉलेज- प्रथम, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी -द्वितीय व स्कूल ऑफ हॉस्पीटलिटी तृतीय, (महिला) कॉलेज ऑफ नर्सिंग - प्रथम, मेडिकल कॉलेज -द्वितीय, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी - तृतीय.
कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
कदमवाडी: सामन्यात स्मॅच मारताना मेडिकलचा विद्यार्थी.
कदमवाडी: आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, समवेत डॉ.व्ही व्ही भोसले, डॉ. राकेश कुमार शर्मा, रुधीर बारदेस्कर, शंकर गोनुगडे आदी.
डी. वाय. पाटील मेडिकल- नर्सिंगचे संघ व्हॉलीबॉलमध्ये विजेते
|