बातम्या
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ३४ वे पेटंट
By nisha patil - 1/1/2024 11:22:28 PM
Share This News:
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ३४ वे पेटंट
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाच्या संशोधकांनी ‘ऊर्जा संचयन’साठी संशोधीत केलेल्या ‘अ मेथड ऑफ सिंथेसाय्झिंग कॉम्पोझीट ऑफ रेडुस्ड ग्राफिन ऑक्साईड अँड निकेल टंगस्टेट फॉर एनर्जी स्टोरेज’ या संशोधनाला पेटंट जाहीर झाले आले. विद्यापीठाला मिळालेले हे ३४ वे पेटंट आहे.
रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले. पुढील २० वर्षासाठी हे संशोधन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केले जाईल.
सदर पद्धतीमध्ये उच्च विद्युत चालकता, उत्कृष्ठ यांत्रिक सामर्थ्य, रासायनीक स्थिरता व उच्च विशिष्ठ पृष्ठभाग असतो. त्यामुळे इतर पदार्थासह परस्पर संवादासाठी एक मोठे सक्रीय क्षेत्र प्रदान केले जाते. सेन्सर्स, संमिश्र उर्जा संचयन आणि इलेक्ट्रोनिक उपकरणासह विविध क्षेत्रात ही पद्धती उपयुक्त ठरू शकते.
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे व यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी दिलीप पाटील, डॉ. धनाजी मालवेकर, संभाजी खोत आणि रणजित निकम यांचा सहभाग होता.
पेटंट मिळवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ३४ वे पेटंट
|