बातम्या
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे मंगळवारी मोफत सेरेब्रल पाल्सी तपासणी शिबिर
By nisha patil - 7/10/2023 5:10:46 PM
Share This News:
कोल्हापूर / डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी राजारामपुरी येथे मोफत सेरेब्रल पाल्सी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सेरेब्रल पाल्सीची लक्षणे आणि परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या हालचाली तसेच त्यांच्या शारीरिक वाढीत होणाऱ्या अडचणीची पाहणी केली जाईल. सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची काळजी अन दक्षता तसेच योग्य उपचार पद्धती याबाबत शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अमृतकुंवर रायजादे यानी दिली.
राजारामपुरी नार्वेकर भाजी मंडई येथील जागृती मंडळ हॉल येथे १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. प्राचार्या डॉ. अमृतकुंवर रायजादे, डॉ. पन्ना शेटे, डॉ. आकांक्षा आनंद या तज्ज्ञ मान्यवरांसोबत फिजिओथेरपी स्टाफ या शिबिरात तापसणी व मार्गदर्शन करणार आहे. शिबिरासाठी येताना सेरेब्रल पाल्सी पेशंटचे सर्व मेडिकल रिपोर्ट्स सोबत घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे मंगळवारी मोफत सेरेब्रल पाल्सी तपासणी शिबिर
|