बातम्या

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात

D Y Chhatrapati Shahu Maharaj Jayanti celebrations in Patil Abhimat University


By nisha patil - 6/26/2023 3:59:56 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात लोकनायक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
सामजिक सुधारणासाठी पुढाकार घेणाऱ्या व समतेचा विचार तळागाळात रुजवणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य सर्वांसाठीचा प्रेरणादायी आहे.  समाजातील सर्वच घटकांच्या सन्मानासाठी महाराजांनी सामजिक क्रांतीची मशाल पेटवली.  करवीर संस्थानात त्यांनी घेतेलेले अनेक क्रांतिकारी निर्णय आजच्या पिढीसाठीसाठीही आदर्शवत आहेत. सामजिक सलोख्यासाठी त्यानी घेतलेले निर्णय दिशादर्शक असून त्यांच्या विचारांचे पाईक होण्याचा प्रयत्न सर्वानीच करणे गरजेचे असल्याचे, डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी सांगितले.
  यावेळी संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, डॉ. अद्वैत राठोड, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. आर. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात