बातम्या

आणि डि.वाय.पाटील दादांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले...

D Y Patil


By nisha patil - 4/25/2024 3:19:17 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी डी.वाय.पाटील दादा व लेखक साहित्यिक शंकर केंबळकर हे दोघे मित्र, लहानपणापासून ते एकमेकांच्या जवळ असायचे खेळायचे बागडायचे अशा जीवलग असणार्या मित्रांची आज पन्नास वर्षाने भेट झाली..आणि दोघांच्या ही  डोळ्यात आनंद आश्रू तरळले!

शंकर केंबळकर यांनी ग्राम मंत्रालय हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्याची प्रत आपल्या आवडत्या मित्राला द्यावी म्हणून आज ही भेट घडली होती.

कोल्हापूर शहराजवळील भोसलेवाडी येथे डी.वाय.पाटील दादा यांची शेती आहे. सदरची शेती परीसरातील अनेक शेतकरी करत होते. या ठिकाणी च्या शेतात हळद घेतली होती. त्या हळदीचे उत्पन्न विक्रमी घेतले होते. याची जिल्ह्यात चर्चा झाली होती. आजही अनेक वेळा त्या हळदीच्या उत्पन्नाची आठवण अनेकजण काढतात.

जेष्ठ साहित्यीक शंकर केंबळकर यांच्या कडेही दादांची शेती कसण्यासाठी होती. बहुतांश वेळा दुष्काळ पडला तर मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा दादा नी घेतला नसल्याचे केंबळकर यांनी आपल्या आठवणीत सांगितले.
 

दोघां मित्रांनी जुन्या गोष्टी ना उजाळा देत चर्चा केली. यावेळी हसत खेळत दोघेही बोलत होते. काही वेळा आनंद अश्रु ढाळत होते.
 

माझ्या उभ्या आयुष्यात मला आनंद झाला तो दादांची भेट झाल्याचा असे जेष्ठ साहित्यीक शंकर केंबळकर यांनी तारा न्युज शी  सांगितले.


आणि डि.वाय.पाटील दादांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले...