बातम्या
डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रकाश बेहेरे यांचे निधन
By nisha patil - 5/1/2024 5:59:25 PM
Share This News:
डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रकाश बेहेरे यांचे निधन
कोल्हापूर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू आणि ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ प्रकाश बेहेरे यांचे गुरुवारी रात्री सेवाग्राम येथे निधन झाले.
प्रा. डॉ. प्रकाष बेहरे यांनी नागपूरच्या दत्ता मेघे मेडिकल कॉलेज येथे मानसोपचार विभागाचे प्राध्यापक व प्रमुख म्हणून काम केले होते. 8 जून 2016 ते 10 मे 2019 या कालावधीत त्यांनी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू म्हणून प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाला नोंदणी मिळाली, तसेच फॅमिली अॅडोब्शनची प्रक्रियाही सुरू झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने नॅक सायकल ‘ए’ मानांकन प्राप्त केले. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठात अनेक नवे अभ्यासक्रम सुरू झाले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये त्यांचा सहभाग होता.
डॉ. बेहेरे यांच्या निधनाबद्दल कुलपती डॉ संजय डी. पाटील यांनी शोक व्यक्त केला. डॉ. प्रकाश बेहेरे यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या मानसोपचार तज्ञ आपण गमावला आहे. उत्तम प्राध्यापक, शिक्षण तज्ञ, कुशल संघटक म्हणून त्यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या प्रगतीत भरीव योगदान दिले होते. त्यांचे कार्य सदैव लक्षात रहील अशा शब्दात डॉ. पाटील यांनी आदरांजली वाहिली. संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनीही डॉ. बेहरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
डॉ. बेहेरे यांच्या निधनाबद्दल विद्यापीठच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुद्गल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रकाश बेहेरे यांचे निधन
|