शैक्षणिक
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा
By nisha patil - 5/3/2025 4:31:24 PM
Share This News:
आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्समध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा ठसा
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर पार पडल्या. कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली. एकूण 89 स्पर्धक सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांच्या हस्ते झाले. 100 मी. धावणे, 200 मी. धावणे, 400 मी. धावणे, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक व 4x100 मी. रिले स्पर्धांमध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान प्राप्त केले.
कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी यशस्वी खेळाडूंना अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा
|