बातम्या

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘रिड्युस्ड ग्राफीन’ला पेटंट

D Y Patil Abhimat University Patent for Reduced Graphene


By nisha patil - 6/22/2023 10:39:52 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी   डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च  विभागातील विद्यार्थ्यानी तयार केलेल्या ऊर्जा साठवण्यासाठी प्रथमच उपयोगात येणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘रिड्युस्ड ग्राफीन ऑक्साईड/डिस्प्रोसियम सेलेनाइड कांम्पोझिट फिल्म्स’ बनविण्याच्या सोप्या आणि कमी  खर्चिक ‘सिलार’ या रासायनिक पद्धतीसाठी पेटंट जाहीर झाले आहे.  विद्यापीठाला मिळालेले हे २२ वें पेटंट आहे.
जगामध्ये नवनवीन तंत्रज्ञाने मोठ्या प्रमाणात विकसित होत असून त्याची मागणी वाढतच आहे. त्यामुळे  ऊर्जा साठवण्याची पद्धतीवर संशोधन महत्वपूर्ण बनले आहे. याचाच एक भाग म्हणून रिसर्च डायरेक्टर व अप्लाईड फिजिक्स या विषयामध्ये नामांकित संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात  १० वर्षापासुन ऊर्जा साठवणीच्या पद्धतीवर  सातत्याने संशोधन सुरु आहे. 

 

 संशोधकांनी भारत सरकारच्या पेटंट प्रमाणपत्र कार्यालयात सन २०२२ मध्ये  संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या ‘सिलार’ पद्धतीसाठी  पेटंट मिळवण्याबाबत अर्ज सादर केला होता. १३ महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती हे पेटंट २९ मे २०२३ रोजी संशोधकांच्या नावे मंजूर केले गेले. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवणुकीची पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल. 
या संदर्भात मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे म्हणाले, विकसित टेक्नॉलॉजीची वाढती मागणी बघता, भारतातील युवा संशोधकांनी नवनवीन पदार्थांपासून चांगल्या प्रतीचे व उच्च दर्जाचे ऊर्जा साठवणे साधने कशी तयार करता येतील यावरती भर द्यावा. भारतीय इले्ट्रॉनिक व टेलिकम्युनीकेशन बाजारपेठेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हातभार लावावा व देशाची आर्थिक स्थिती सक्षम करावी. सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्याaपातळ फिती या ऊर्जा साठवणुकीसाठी बनवल्या जाणाऱ्या विद्युत घट तसेच सुपरकपॅसिटर मध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत.

    या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी संभाजी खोत, डॉ. धनाजी माळवेकर, डॉ. प्रिती बागवडे आणि रणजित निकम यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘रिड्युस्ड ग्राफीन’ला पेटंट