बातम्या

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या अनुष्काला ५.१० लाखाचे पॅकेज

D Y Patil Architecture 5 10 lakh package to Anushka


By nisha patil - 10/30/2023 10:46:07 PM
Share This News:



कसबा बावडा/ डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरची विद्यार्थिनी अनुष्का महेश सोनवणे हिची अहमदाबाद येथील अरविंद स्मार्ट स्पेस लिमिटेड या कंपनीमध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर म्हणून निवड झाली आहे. तिला ५ लाख १० हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्याचबरोबर वर्धन सामाणी याची पुणे येथील ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर आर्कीटेक्ट डिझाईन्स येथे ३ लाख ६० हजाराच्या पॅकेजवर निवड झाली आहे.

     डी वाय पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे ही निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे विद्यार्थ्यांना विविध प्रकारची सॉफ्ट स्किल्स व प्रशिक्षणे दिली जातात. व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. मॉक इंटरव्ह्यू आणि ऑनलाईन ट्रेनिंगचेहि आयोजन केले जाते. याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.

 

   विभाग प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव, प्लेसमेंट को-ऑर्डीनेटर संतोष आळवेकर व प्राध्यापक पूजा जिरगे यांचे अनुष्का व वर्धन यांना  मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, कॅम्पस टीपीओ प्रा. सुदर्शन सुतार,  टीपीओ मकरंद काइंगडे यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.


डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या अनुष्काला ५.१० लाखाचे पॅकेज