बातम्या

डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ कार्यशाळा उत्साहात

D Y Patil College of Pharmacy Campus to Corporate workshop in full swing


By nisha patil - 11/2/2024 9:45:20 PM
Share This News:



प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे, हे वेगळेपण ओळखून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्राधान्य दिले तरच प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन स्मार्टवंट ट्रेनिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक श्री. संतोष सांगवे यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ ही दोन दिवसीय या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 

या दोन दिवसीय  कार्यशाळेचे उद्घाटन संतोष सांगवे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सांगवे यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आत्मविश्वासाने प्रवेश करण्यासाठी  विद्यार्थ्यांना मोटिवेशन आणि यशस्वी करिअर, सकारात्मक माणसे, व्यक्तिमत्व विकास, ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न, संवाद कौशल्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले.  कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी भविष्यातील फार्मसी क्षेत्रातील व्यवसायाच्या विविध संधी, उच्च शिक्षण, मुलाखतीसाठी तयारी, बायोडाटा कसा तयार करावा, मुलाखत कशी द्यावी या विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी सकारात्मक चित्रफिती दाखवून त्यांनी मुलाखत तंत्राबाबत माहिती दिली.
   
विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी त्यांच्यामधील अंगीभुत क्षमता कला गुणांचा विकास होणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडवून आणला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे, हे वेगळेपण ओळखून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्राधान्य दिले तरच प्रगती होऊ शकते.
    
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापक समृद्धी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली निरंकारी यानी तर  आभार प्रदर्शन प्राध्यापिका स्नेहल कोरफळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. केतकी धने यांनी  केले. जय पोर्लेकर,मुस्कान सिंग, वैष्णवी मंगरूळे यांनी विशेष परिश्रम घेतले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले व प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कदमवाडी- संतोष सांगवे यांचे स्वागत करताना डॉ केतकी धने


डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ कार्यशाळा उत्साहात