बातम्या

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये करीअर संधीबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न

D Y Patil College of Pharmacy Guidance camp on career opportunities concluded


By nisha patil - 4/8/2023 9:16:51 PM
Share This News:



कोल्हापूर:  डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने ‘औषधनिर्माणशास्त्र व  करिअर संधी’ या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. अपेक्स इंडिया स्टार्टअप प्रोग्रॅमचे प्रमुख सचिन कुंभोजे व विश्वजीत काशीद यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

फार्मसी अभ्यासक्रमानंतर करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. देशाची आरोग्यव्यवस्था मजबूत करण्यात फार्मसी क्षेत्राचे अमूल्य योगदान आहे. औषधनिर्माण क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताने मोठा ठसा उमटवला असून भविष्यात हे क्षेत्र आणखी वेगाने विस्तारणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अमाप संधी उपलब्ध होणार असल्याचे सचिन कुंभोजे व विश्वजीत काशीद यांनी सांगितले. 

   फार्मसी मधील विविध करिअरच्या संधी, कार्पोरेट क्षेत्रातील शिष्टाचार व स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धात्मक युगामध्ये आपला ठसा कसा उमटवू शकेल यावरही मार्गदर्शन करण्यात आले. 

 प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन डॉ. केतकी धने यांनी केले. सदर शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी डॉ. अभिनंदन पाटील व प्राध्यापक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश  कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये करीअर संधीबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न