बातम्या

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ए.आय.च्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत यश

D Y Patil Engineering GATE Exam Success of AI  Students


By nisha patil - 3/20/2024 4:38:13 PM
Share This News:



कसबा बावडा  येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय. )विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी अर्थात गेट -२०२४ (GATE) परीक्षेत पात्रता मिळवली आहे.

महाविद्यालयाच्या अभिषेक स्वामी याने गेट-डीए (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंड डाटा सायन्स) आणि जानव्ही जाधव हिने  गेट-सीएस (कॉम्प्युटर सायन्स) या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. देशपातळीर अतिशय काठीण्य पातळी असलेली परीक्षा म्हणून गेटची ओळख आहे. या परीक्षेत या दोन्ही विद्यार्थ्यानी सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. 

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स  विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ए.आय.च्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत यश