बातम्या
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 80 रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी
By nisha patil - 12/23/2023 8:08:38 PM
Share This News:
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 80 रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी
-अमेरिकेतील विश्वविख्यात सर्जन डॉ. राज लाला व टीमचे सहकार्य
-भारतीय जैन संघटना, डॉ. शीतल पाटील फौंडेशनचा उपक्रम
कसबा बावडा/ वार्ताहर भारतीय जैन संघटना, पश्चिम महाराष्ट्र आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी यांच्यावतीने आयोजित दोन दिवसीय विशेष शिबिरात 80 रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. अमेरिकेतील विख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व त्यांची टीम, डॉ. शीतल पाटील आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल सर्जरी विभाग यांनी संयुक्तरीत्या या शस्त्रक्रिया केल्या.
पद्मश्री डॉ. शरद दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ निधनानंतर त्यांचे शिष्य डॉ. राज लाला यांच्याकडून या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालय, कदमवाडी येथे 22 आणि 23 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टीटयूट, भारतीय जैन संघटना, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनफेडरेशन इचलकरंजी, जैन डॉक्टर्स फेडरेशन, डॉ. शीतल पाटील फौंडेशन कोल्हापूर, क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समाजातील रुग्णासाठी हे हे शिबीर घेण्यात आले. यासाठी 185 रुग्णांनी नोंदणी केली होती. यातील 80 रुग्णांवर रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या.
शुक्रवार व शनिवारी झालेल्या या शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूपता, व्रण, डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यांमधील विकृती अशा सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी दिली.
या प्रकल्पाचे चेअरमन डॉ शीतल पाटील, भारतीय जैन संघटना अध्यक्ष गौतमचंद मुथा, ऋषभलाल छाजेड, अरुणकुमार ललवाणी, अमृतलाल पारख, आशिष शहा, पारस ओसवाल यांच्यासह पदाधिकारी व सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यावेळी उपस्थित होते. हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ शीतल मुरचुटे, भुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ संदीप कदम व सहकारी तसेच शस्त्रक्रिया विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ आर. के. शर्मा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 80 रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी
|