शैक्षणिक

डी. वाय पाटील साळोखेनगर मध्ये इन्व्हेंटो २०२५ संपन्न

D Y Patil Invento 2025 concluded in Salokhenagar


By nisha patil - 7/4/2025 4:12:26 PM
Share This News:



डी. वाय पाटील साळोखेनगर  मध्ये  इन्व्हेंटो २०२५ संपन्न

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर मध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन  (आयएसटीई) च्या सहकार्याने इन्व्हेंटो २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.
 

आयएसटीईचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर आणि कसबा बावडा पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते याच उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांनी आज समाजाला भेडसवणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा अस आवाहन केलं.  विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनात उद्योग व्यवसायांसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठीची कौशल्य आत्मसात करावीत या उद्देशान इन्व्हेंटो
सारख्या टेक्निकल इवेंटचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगत अशा इव्हेंट मधील सहभागातून भविष्यातील नव्या स्टार्टअपच्या संकल्पना उदयाला येतील असा विश्वास व्यक्त केला.
 
यावेळी कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजित माने यांनी बोलताना अशा प्रकारच्या इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील  इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी यांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते असे सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी कॉलेजच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास उपक्रमांची माहिती दिली.

इनेव्न्टो 2025 मध्ये दहा विविध तांत्रिक कौशल्य आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये इलेक्ट्रो क्वेस्ट, इलेक्ट्रो जिनीयस, कोडझेन, ब्लाइंड सी, बिल्ड स्मार्ट, सर्व्हे मास्टर, ग्रूप डिस्कशन, रिल बॅटल यांचा समावेश होता.
 

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील विविध डिप्लोमा व डिग्री महाविद्यालयातून 750 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी तसेच सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.या इव्हेंटचे संयोजन डीन स्टुडन्ट वेल्फेअर गौरव देसाई यांनी व विद्यार्थी समन्वयक, स्टाफ यांनी यशस्वीरीत्या केले.

या इव्हेंटसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश माने, कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, विश्वस्त माननीय तेजस पाटील, माननीय ऋतुराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माननीय आमदार श्री. सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


डी. वाय पाटील साळोखेनगर मध्ये इन्व्हेंटो २०२५ संपन्न
Total Views: 24