बातम्या
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 11/9/2023 5:58:20 PM
Share This News:
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे ‘नासा’ (नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर ) तर्फे ९ व १० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रच्या वेस्ट झोन मधील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, तळसंदे व कोल्हापूर येथील एकूण १३ आर्किटेक्चर महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव, आर्की. पूनम सोळंकी, आर्की. आकाश शहा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळेचे उदघाटन झाले. आर्की. पूनम सोळंकी व आर्की. आकाश शहा (मानवाकृती आर्किटेक्चर, पुणे) यांनी टेनसाईल स्ट्रक्चर या विषयावर सर्व विद्यार्थ्यांना स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केले. टेनसाईल स्ट्रक्चरचे विविध प्रकार, स्ट्रक्चरल मेंबर्स, जोईनरी डिटेल्स याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. टेनसाईल स्ट्रक्चरच्या दोन प्रकारचे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षामध्ये या वर्कशॉपमध्ये तयार केले. संध्याकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यासाठी कल्चरल प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाचे माजी विदयार्थी नामवंत आर्की. अभय पिसे (इचलकरंजी) यांचा इन्फ्यूजिंग नेचर इन रेसिडेंशिअल बिल्डींग्स या विषयावरील परिसंवाद झाला. निसर्गाशी एकरूप असणारी घरांची संरचना, वस्तू रचनेतील पारंपरिक घटकांचा अत्याधुनिक पद्धतीने करता येणार वापर, नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा इंटिरियर मध्ये करता येणारा वापर अशा अनेक गोष्टी आर्की. अभय पिसे यांनी त्यांच्या परिसंवादामध्ये तपशीलवारपणे मांडल्या. त्यांनी डिझाईन केलेल्या अनेक रहिवासी इमारतींची रचना, संकल्पना व निसर्गाशी या घटकांचा होणार सुसंवाद अशा गोष्टी विद्यार्थ्याना सादर केल्या. दुपारच्या सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यासाठी आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. आर्की. रवींद्र सावंत, आर्की. इंद्रजीत जाधव व आर्की. तेजस पिंगळे यांनी या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पहिले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी सांघिक भावनेतून काम करण्याची प्रेरणा मिळावी व अभ्यासक्रमामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची उमेद निर्माण व्हावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. प्राध्यापक आर्की. शैलेश कडोलकर (नासा कोऑर्डिनेटर), डॉ. सुप्रिया पाटील (वर्कशॉप कोऑर्डिनेटर), आर्की. पूजा जिरगे (डिझाईन कॉम्पिटिशन कोऑर्डिनेटर) व विध्यार्थी प्रतिनिधी कु. कीर्ती बोदगिरे (स्टुडन्ट प्रेसिडेंट) यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे विभागाचे प्रमुख प्रो. आय. एस. जाधव व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर- डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये आयोजीत कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
|