शैक्षणिक

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड

D Y Patil School of Hospitality 49 students selected for training


By nisha patil - 5/2/2025 5:33:12 PM
Share This News:



डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९  विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड
 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षातील ४९ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. विविध हॉटेल व्यवस्थापनांकडून मुलाखतीद्वारे ही निवड केली गेली आहे. विद्यार्थ्यांना हॉटेल्समध्ये विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

या प्रशिक्षणासाठी निवडलेले विद्यार्थी गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, आणि बेळगावमधील हॉटेल्समध्ये कार्यरत असतील, ज्यात कॉनराड, डब्लू, सयाजी हॉटेल, हिल्टन गार्डन, द वेस्टीन, द ललित, मुझा हॉस्पिटॅलिटी, फोर सिझन्स यांसारखी प्रतिष्ठित हॉटेल्स समाविष्ट आहेत.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये बी. एस. सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेतला जातो, ज्यात प्रात्यक्षिक ज्ञानावर विशेष लक्ष दिले जाते. महाविद्यालयाच्या प्राचार्य रुधीर बारदेस्कर आणि ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर सुरज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.


डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड
Total Views: 50