बातम्या

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी

D Y Patil Social Commitment of Engineering Students


By nisha patil - 9/29/2023 5:09:33 PM
Share This News:



 गणेश विसर्जन  मिरवणुकीत साउंड  सिस्टीमचा आवाजाच्या तीव्रतेचा त्रास होऊ नये यासाठी डी वाय  पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकी दरम्यान कापसाच्या बोळ्यांचे वाटप करत लोकांचे प्रबोधन केले.  गेले बारा वर्षे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

विसर्जन मिरवणूक म्हटले की मोठ्या आवाजाची गाणी, हृदयात धडकी भरवणारी साऊंड सिस्टीम असे चित्र तयार झाले आहे.  आबालवृद्धांना आवाजाचा त्रास होऊ नये व विसर्जन मिरवणुकीचाही आनंद घेता यावा यासाठी विद्यार्थ्यानी मोफत कापसाचे बोळे वाटत सामाजिक बांधिलकीची जाणीव घट्ट केली.

 संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष  आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,पृथ्वीराज पाटील यांचे उपक्रमासाठी प्रोत्साहन, तर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे सहकार्य मिळाले.

   अधिष्ठाता व जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर,  एन. एस. एस.प्रकल्प अधिकारी श्री योगेश चौगुले, डॉ.राहुल पाटील, श्री. तुषार आळवेकर यांच्यासमवेत संकेत घाटगे, स्वप्निल माने, वैष्णवी पंजाल, अथर्व गगाने, गौरव चौगले,अथर्व ढेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोल्हापूर: साउंड  सिस्टीमचा आवाजाबाबत जनजागृती करताना   डी वाय  पाटील अभियांत्रिकीचे एन एस एस विद्यार्थी व प्राध्यापक.


डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी