बातम्या
डी. वाय .पाटील आर्किटेक्चरमध्ये ’सर्व्हिसेस इन हायराईस बिल्डिंग’ वर सेमिनार संपन्न
By nisha patil - 2/10/2023 8:04:52 PM
Share This News:
कसबा बावडा/ डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा आणि डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ख्यातनाम वास्तू विशारद रोहित सरदेसाई याचे ‘’सर्व्हिसेस इन हायराईस बिल्डिंग’’ या विषयावरील सेमिनार उत्साहात संपन्न झाले.
पुणे येथील कुमार प्रॉपर्टीजचे वाईस प्रेसिडेंट सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना पुणे येथील विविध आर्किटेक्चरल प्रोजेक्टची माहिती दिली. पहिल्या सत्रात हायराईस बिल्डिंग मधील प्लंम्बिंग सर्व्हिसेस, इलेकट्रीकल सर्व्हिसेस, फायर फायटिंग सर्व्हिसेस याबाबत त्यानी सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टम आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट या सर्व्हिसेस व त्याच्या अंमलबजावणीबाबतची काळजी यावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. यावेळी विध्यार्थ्यांच्या विविध शंकांचेही त्यांनी निरसन केले.
डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तळसंदेचे प्राचार्य आर्की. सी. एस. दुदगीकर आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर कसबा बावडाचे विभाग प्रमुख आर्की. इंद्रजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्की. दिग्विजय पाटील, आर्की. पूजा जिरगे, आर्की. कृष्णाली पाटील, आर्की. मनजीत जाधव यांनी सेमिनारचे संयोजन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी.चेडे, आर्की. आर. जी. सावंत आणि रजिस्टर डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन लाभले.
कसबा बावडा: आर्की. रोहित सरदेसाई यांच्यासोबत आर्की. सी. एस. दुदगीकर, आर्की. इंद्रजित जाधव व सहकारी.
डी. वाय .पाटील आर्किटेक्चरमध्ये ’सर्व्हिसेस इन हायराईस बिल्डिंग’ वर सेमिनार संपन्न
|