बातम्या
डी. वाय. पाटील स्थापत्य अभियांत्रिकीच्या ७ विद्यार्थ्यांची राज्य सरकारच्या सेवेत नियुक्ती
By nisha patil - 6/8/2023 6:30:41 PM
Share This News:
कसबा बावडा: वार्ताहर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिरिंग विभागाच्या ७ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग, म्हाडा, भूमिअभिलेख अशा विभागामध्ये निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागामध्ये इंजी. धनश्री दत्तात्रय गुरव, इंजि. ऐश्वर्या शंकर झांबरे, इंजि. ऋषिकेश रघुनाथ बागडी, इंजि. पुजा उत्तम शेणवी यांची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) (सरळसेवा भरती) या पदावर नियुक्ती झाली आहे. इंजि. संदेश विलास गणेशाचार्य, इंजि. ऐश्वर्या दत्तात्रय चव्हाण यांची भूमिअभिलेख विभागात भुकरमापक तथा लिपिक-टंकलेखक गट-क या पदावर तर इंजि. अविनाश बळवंत कुरूपखेले याची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर नियुक्ती झाली आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाच्यादृष्टीने प्रथम वर्षापासूनच विविध प्रकारचे ट्रेनिंग स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाकडून दिली जातात. कौशल्य विकास व व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला जातो. त्यामुळेच विद्यार्थ्यांना विविध कंपनीबरोबरच सरकारी नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष कुमार चेडे, रजि. डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. सुदर्शन सुतार, डॉ. के. एम. माने, प्रा. अजिम सुतार, प्रा. अमित पाटील,प्रा मकरंद काईंगडे आदींनी अभिनंदन केले आहे.
कसबा बावडा: सरकारी सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. के. एम. माने व प्राध्यापक वर्ग.
डी. वाय. पाटील स्थापत्य अभियांत्रिकीच्या ७ विद्यार्थ्यांची राज्य सरकारच्या सेवेत नियुक्ती
|