बातम्या

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

DY Patil Abhimat University 75th Republic Day in full swing


By nisha patil - 1/27/2024 7:23:09 PM
Share This News:



कसबा बावडा डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ  व डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शुक्रवारी 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला .डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त पृथ्वीराज  संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थित ध्वजारोहण झाले .

 डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ विद्यापीठ येथे झालेल्या समारंभ डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कृषी तंत्र विद्यापीठ तळसंदे चे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

   यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यानंतर छोट्या मुलांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून प्रजसत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसी विद्यार्थांनी परेडचे प्रात्यक्षिक सादर केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. 

यावेळी सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी.डी.लोखंडे, स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉ. अजित पाटील, प्राचार्य डॉ.चंद्रप्रभू जंगमे,  डॉ. आर. एस. पाटील, डॉ. अमृतकुवर रायजादे, रुधिर बार्देसकर, जानकी शिंदे, उप कुलसचिव संजय जाधव, सुरेश खोपडे,  कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशिल इंगळे आदींसह विवीध विभागाचे विभाप्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय
 कसबा बावड्यातील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ध्वजारोहण आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी संचालक ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, रजिस्टर डॉ. लितेश मालदे, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 ध्वजवंदनानंतर  सामुदायिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले.आमदार पाटील यांनी महापुरुषांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.  यावेळी स्टुडन्ट अफेअरचे अधिष्ठाता डॉ. आर. ए. पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.a

कसबा बावडा-डी वाय पाटील विद्यापीठ येथे ध्वजवंदन करताना आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. राकेश कुमार मुदगल डॉ. के प्रथापन, डॉ. राकेश कुमार शर्मा. 

कसबा बावडा- डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ध्वजवंदन करताना आमदार ऋतुराज पाटील, डॉ. संतोष चेडे, डॉ. महादेव नरके, डॉ. लितेश मालदे, श्रीलेखा साटम.


डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात