बातम्या
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मिड स्वीडन विद्यापीठाशी सामंजस्य करार
By nisha patil - 3/17/2024 10:21:16 PM
Share This News:
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मिड स्वीडन विद्यापीठाशी सामंजस्य करार
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर आणि मिड स्वीडन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे.
या करारावर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी तर स्वीडन विद्यापीठाकडून उप- कुलगुरु प्रा. हॅन्स एरिक निल्सन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
प्रा. नेल्सन म्हणाले, ऊर्जा साधनांच्या निर्मितीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात एकत्र संशोधन करता येणार आहे. हरित ऊर्जा साधनांची निर्मिती क्षमता लक्षात घेता त्यामध्ये वृद्धी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
स्वीडन विद्यापीठात कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माजी संशोधक डॉ. मनीषा फडतरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट ट्रेनिंग व संयुक्तरीत्या संशोधन करता येणार असल्याचे सांगितले.
कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. विश्वजीत खोत, डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. मेघनाथ जोशी आदी उपस्थित होते.
कोल्हापूर: सामंजस्य करारावेळी डॉ. राकेश कुमार मुदगल व प्रा. हॅन्स एरिक निल्सन. समवेत डॉ. सी. डी. लोखंडे, जोहान सीडन, जोनास आर्टिग्रेन, डॉ. विश्वजीत खोत, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. मेघनाथ जोशी आदी.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मिड स्वीडन विद्यापीठाशी सामंजस्य करार
|