बातम्या
डी.वाय.पाटील मेडिकल संघाला विजेतेपद
By nisha patil - 12/29/2023 10:58:46 PM
Share This News:
डी.वाय.पाटील मेडिकल संघाला विजेतेपद - डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर /प्रतिनिधी डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले.
डी.वाय.पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अभिजीत कोराणे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. ए.ए.राठोड यांनी नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे, तसेच सर्व कॉलेजचे स्पोर्ट्स इन्चार्ज उपस्थित होते.
अंतिम सामना मेडिकल कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी या दोन् संघात झाला. मेडिकल कॉलेजने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. यासीर शेख व सुकरीत यादव यांच्या अनुक्रमे 85 धावा (55 चेंडू) व 74 धावा (49 चेंडू) जोरावर मेडिकल कॉलेजने 20 षटकात 189 धावा केल्या. फार्मसी कॉलेजचे खेळाडू रितेश इंगोले व पारस पाटील यांनी अनुक्रमे 13 धावा व 27 धावा केल्या मात्र त्यांचा संघ सर्व बाद 94 धावाच करू शकला. मेडिकल कॉलेज आदित्य देवल याने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकट 13 धावा देऊन 2 गडी बाद केले.
या स्पर्धेत कॉलेज ऑफ नर्सिंगच्य संघाने तृतीय स्थान मिळवले.
कुलपती डॉ.संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कुलगुरू डॉ.राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
कदमवाडी: आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामन्यात नाणेफेक करताना डॉ. अद्वैत राठोड समवेत डॉ अभिजीत कोराणे, शंकर गोनुगडे आदी.
डी.वाय.पाटील मेडिकल संघाला विजेतेपद
|