बातम्या
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र
By nisha patil - 3/4/2024 7:25:30 PM
Share This News:
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमार्फत गतवर्षीपासून बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. २०२४-२५ साठी अभ्यासक्रमाना प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती व मार्गदर्शन केंद्र तसेच नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी दिली.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, दिल्ली (एआयसीटीई)यांनी या सर्व अभ्यासक्रमांची गुणवत्ता वाढावी व त्याचबरोबर एक मॉडेल अभ्यासक्रम बनवण्यासाठी पुढाकार घेत या सर्व अभ्यासक्रमांना तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता घेणे बंधनकारक केले आहे. त्याचा फायदा रोजगाराभिमुख विद्यार्थी घडवण्यासाठी होणार आहे.
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्या बीबीए आणि बीसीए या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मान्यतेसाठी एआयसीटीई कडे अर्ज केला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.
अतिशय उच्च दर्जाच्या भौतिक सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, कुशल प्राध्यापक वर्ग, रोजगाराभिमुख शिक्षण आणि कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यामधून बस सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहेत.
या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश नियामक मंडळाच्यावतीने बारावी परीक्षा दिलेल्या आणि बीबीए आणि बीसीए प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे. त्याची नोंदणी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावरती करणे गरजेचे आहे.
याबाबत विद्यार्थ्यांना मार्ग्दर्शन करण्यासठी डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रवेश परीक्षा माहिती व मार्गदर्शन केंद्र त्याचबरोबर प्रवेश परीक्षा नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. जे विद्यार्थी सध्या बारावी उत्तीर्ण आहेत किंवा यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, संचालक डॉ. अजित पाटील, प्रा. अश्विन देसाई आणि प्रा. अभिजित मटकर यांनी केले आहे.
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र
|