बातम्या

डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीच्या विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नामांकित हॉटेलमध्ये निवड

DY Patil School of Hospitality Students choice of reputed hotels in America


By nisha patil - 7/15/2023 7:04:34 PM
Share This News:



डी वाय पाटील स्कूल ऑफ  हॉस्पिटॅलीटीच्या विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नामांकित हॉटेलमध्ये निवड 

कसबा बावडा :  डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नामांकित हॉटेल्स आणि क्रुज लाईनवर निवड झाली आहे. ऋषिकेश झेले व स्वीडल डिसुजा याची अमेरिकेतील जे. डब्लू. मॅरियटमध्ये, सम्राट अक्कोळे याची हॉटेल इफी, विवेक अरगडेची एवलॉन हॉटेल, प्रतिक कुपाडे याची हॉटेल हिल्टन, आदित्य टऊळ याची हॉटेल क्लीवो, आकाश भोसले याची कोस्टा पॅसिफिक क्रुजवर निवड झाली आहे. 

सम्राट अकोले

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलीटी तर्फे बी.एस.सी. हॉस्पिटॅलीटी स्टडिज हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर नेहमीच भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासावर भर देऊन इंटरव्यूची परिपूर्ण तयारीही विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जाते.

आदित्य टउळ

हॉटेल मॅनेजमेंटमधील परीपूर्ण ज्ञान देणाऱ्या बी. एस्सी हॉस्पिटॅलीटी स्टडिज या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देश-परदेशातील पंचतारांकित हॉटेल्स, क्रुज, टूरीझम कंपनी, रीटेल, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी आहेत. २०२३- २४ साठी डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पीटलिटीमध्ये या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु असून आपल्या उज्वल  करिअरसाठी आजच प्रवेश निश्चित करा असे आवाहन प्राचार्य रुधिर बारदेस्कर यांनी केले आहे.

स्वीडल डिसुझा

परदेशी हॉटेल मध्ये निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले  यांनी अभिनंदन केले आहे

प्रतीक कुपाडे

 


डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीच्या विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नामांकित हॉटेलमध्ये निवड