बातम्या

डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा ''अवॉर्ड ऑफ ऑनर'' ने गौरव

DY Patil University of Agriculture and Technology Vice


By nisha patil - 9/27/2023 6:26:57 PM
Share This News:



कोल्हापूर: डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना प्रतिष्ठित जस्ट ऍग्रीकल्चर ग्रुपकडून '' अवॉर्ड ऑफ ऑनर'' पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.  

डॉ.के. प्रथापन हे डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून सध्या कार्यरत आहेत. एक आदर्श प्राध्यापक ते उत्तम शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.  शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रशासनाचा अमीट ठसा उमटविला आहे. डॉ.प्रथापन हे भारत सरकार च्या आयसीएआर, एफडीए, एफएसएसएआय, नॅक , युजीसी व इतर समित्यांवर मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहतात. 

    शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये आयईईई कडून २०२२ साली 'इलाईट अकॅडमिसिएन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'बेस्ट इंटरनॅशनल रिव्युवर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अनेक शासकीय व निमशासकीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत. 

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ.प्रथापन म्हणाले '' हा पुरस्कार माझ्यासाठी अनमोल आहे. या पुरस्कार रूपाने कामाची पोहचपावती मिळाली आहे. पुरस्कार कर्तुत्वाला चालना देतात व नवी ऊर्जा देतात.  पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढेल.येणाऱ्या काळात  डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही उत्तम दर्जाचे पदवीधर तयार करू व यासाठी फॉरेन युनिव्हर्सिटी कॉलॅबोरेशन, रिसर्च, पेटंट फाइल्स, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस, ऍग्री व फूड टेक मध्ये सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स व अन्य महत्वाच्या कोर्सेस वर भर देऊन विद्यापीठाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवू.'' 

या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष  आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी डॉ. प्रथापन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा ''अवॉर्ड ऑफ ऑनर'' ने गौरव