बातम्या
डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांचा ''डॉ. एम एस स्वामीनाथन मेमोरियल'' पुरस्काराने गौरव
By nisha patil - 1/15/2024 6:33:31 PM
Share This News:
डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांचा
''डॉ. एम एस स्वामीनाथन मेमोरियल'' पुरस्काराने गौरव
कोल्हापूर: डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना ''डॉ. एम एस स्वामीनाथन मेमोरियल'' पुरस्काराने गौरविण्यात आले. गुजरात नॅशनल फार्मिंग युनिव्हर्सिटी, आय.आय.एम.यु, मेरठ आणि आय.सी.ए.आर. दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषीशास्त्र आणि पीक उत्पादन व्यवस्थापन, कृषी उच्च शिक्षण क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी व शेतकऱ्यांसाठी केलेले कृषी प्रकल्प याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
कुलगुरू डॉ. प्रथापन हे डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी फलोत्पादन आणि कृषी उच्च शिक्षण क्षेत्रात आपल्या प्रशासनाचा अमीट ठसा उमटविला आहे. डॉ.प्रथापन हे भारत सरकारच्या आय.सी.ए.आर, नॅक , युजीसी व इतर समित्यांवर ते मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहतात.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. +अनेक शासकीय व निमशासकीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्य आहेत. प्रगत प्रशिक्षण आणि इंटर्नशिप, संशोधन, प्रकाशन आणि परिषदांसाठी आंतरराष्ट्रीय विद्याशाखा आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी त्यांनी दहाहून अधिक परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केला आहे.त्यांनी आधीच डी वाय पाटील विद्यापीठात मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी -२०२० लागू केली आहे तसेच युनिव्हर्सिटीमध्ये इंडस्ट्री रेडी इनोव्हेटिव्ह कोर्सेस आणि सर्व कोर्सेसमधील कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु केले आहेत. ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढे प्रशिक्षण आणि प्लेसमेंटसाठी होतो.या सर्व स्तुत्य उपक्रमांचा विचार करून हा पुरस्कार प्रदान केला आहे.
त्यांनी केरळ कृषी विद्यापीठात १९९६-२०२१ मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त२००७ ते २०१६ या कालावधीत राज्य फलोत्पादन मिशन केरळ चे संचालक तसेच पुढे कृषी पीपीएम सेलचे संचालक आणि केराफेड, हॉर्टिकॉर्प, केरळ फीडस आणि एमपीआय चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पहिले आहे. ते मूळचे त्रिवेंद्रमचे रहिवासी आहेत.
या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ जयेंद्र खोत यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांचा ''डॉ. एम एस स्वामीनाथन मेमोरियल'' पुरस्काराने गौरव
|