बातम्या

डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा ''आऊटस्टँडिंग लीडरशिप'' पुरस्काराने गौरव

DY Patil University of Agriculture and Technology Vice Chancellor Dr K Prathapan honored


By nisha patil - 11/24/2023 11:28:40 PM
Share This News:



डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा ''आऊटस्टँडिंग लीडरशिप'' पुरस्काराने गौरव

कोल्हापूर: डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ.के.प्रथापन  यांना प्रतिष्ठित लिंकड इन यांच्याकडून '' आऊटस्टँडिंग  लीडरशिप इन हायर एज्युकेशन'' पुरस्काराने गौरविण्यात आले. लिंकड इन यांच्यावतीने पुणे येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.  
कुलगुरू डॉ.प्रथापन हे डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून सध्या कार्यरत आहेत. एक आदर्श प्राध्यापक ते उत्तम शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या प्रशासनाचा अमीट ठसा उमटविला आहे. डॉ.प्रथापन हे भारत सरकार च्या आयसीएआर, नॅक , युजीसी व इतर समित्यांवर ते मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहतात. 
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ते अनेक शासकीय व निमशासकीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्य आहेत. 

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ.प्रथापन म्हणाले '' जीवनात आई वडील, पद्मश्री डॉ डी वाय पाटील, कुलपती डॉ संजय डी पाटील यांचे आशीर्वाद, हितचिंतक यांच्या जोरावरच सफल झालो आहे. माझ्या यशात या प्रत्येक घटकाचा वाटा आहे. भविष्यात डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही उत्तम दर्जाचे पदवीधर तयार करू व यासाठी फॉरेन युनिव्हर्सिटी कॉलॅबोरेशन, रिसर्च, पेटंट फाइल्स, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस, व अन्य महत्वाच्या कोर्सेस वर भर देऊन विद्यापीठाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवू असे आश्वासन दिले.''

या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार मा.ऋतुराज पाटील, कुलसचिव प्रा.डॉ जयेंद्र खोत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा ''आऊटस्टँडिंग लीडरशिप'' पुरस्काराने गौरव