बातम्या
डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये कॅपस्टॉन प्रोजेक्ट एक्झिबिशन संपन्न
By nisha patil - 5/24/2024 11:43:41 PM
Share This News:
डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅपस्टॉन प्रोजेक्ट एक्जीबिशन आयोजित करण्यात आले होते.
एक्जीबिशनचे उद्घाटन डी वाय पाटील कार्यकारी संचालक डॉ.ए के गुप्ता, प्राचार्य डॉ.एस डी चेडे यांच्या हस्ते झाले. 1500 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी 219 प्रोजेक्ट सादर केले होते. यामध्ये ऑनलाइन मतदान प्रक्रिया, फेस रॅकगनाईज अटेंडन्स सिस्टीम, वेब डिझाईनिंग, अँड्रॉइड बेस्ट पार्किंग सिस्टीम, ए आय कन्सल्टन्सी, ए आय फिंगर प्रिंट डोर लॉक सिस्टीम, नैसर्गिक घटकापासून साबण तयार करणे,जंगली जनावरा पासून शेतीचे संरक्षण अशा अशा विविध विषयांवर प्रोजेक्टचा समावेश होता.
यातील 30 बेस्ट प्रोजेक्टची निवड करण्यात आली. डी वाय पाटील ग्रुपचे ट्रस्टी पृथ्वीराज संजय पाटील यांच्या हस्ते बेस्ट प्रोजेक्ट सादर करणाऱ्या विद्यार्थ्याना रोख पारितोषिक, ट्रॉफी व रँक सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस डी चेडे, रजिस्टर डॉ एल व्ही मालदे, डायरेक्टर अजित पाटील, विभाग प्रमुख डॉ. नवनीत सांगळे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पवळे यांनी मानले. एक्झिबिशन पाहण्यासाठी 500 हून अधिक पालक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कसबा बावडा- बेस्ट प्रोजेक्ट सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करताना पृथ्वीराज पाटील. समवेत डॉ. ए. के. गुप्ता, डॉ संतोष चेडे, डॉ. अजित पाटील, डॉ. लितेश मालदे, डॉ. नवनीत सांगळे आदी.
डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये कॅपस्टॉन प्रोजेक्ट एक्झिबिशन संपन्न
|