बातम्या

डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये डीप लर्निंग कार्यशाळा संपन्न

DY Patil in Engineering Deep Learning Workshop Concluded


By nisha patil - 12/3/2024 7:34:56 PM
Share This News:



 कोल्हापूर: येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे  एक दिवसीय डीप लर्निंग या कार्यशाळा संपन्न  झाली. विद्यार्थ्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या क्षमतेत वृद्धी करून त्यांच्या करिअरसाठी नवीन दिशा देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. 
    
या कार्यशाळेसाठी आयआयआयटी नागपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निलेशचंद्र पिकले  यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.  कार्यशाळेच्या शेवटी एनव्हीडीआय कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली, यातील  उत्तीर्ण विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले.  या परीक्षेसाठी 90 डॉलर खर्च येतो मात्र एनव्हीडीआय डीप लर्निंग इन्स्टिट्यूटमार्फत महाविद्यालयाच्या 80 विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मोफत घेण्यात आली.

या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त झाली.  प्रायोगिक प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी त्याचा वापर समजून घेतला. 

 या कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील,  प्रा. नितीश शिंदे व इतर प्राध्यापक वर्ग यांनी केले.  शिवाजी युनिव्हर्सिटी लीड कॉलेज स्कीम अंतर्गत हे वर्कशॉप घेण्यात आले.

  संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील , उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन लाभले.


डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये डीप लर्निंग कार्यशाळा संपन्न