बातम्या
डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन
By nisha patil - 3/16/2024 7:43:25 PM
Share This News:
डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडाच्या उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा क्लबतर्फे एमपीएससी आणि यूपीएससी या विषयावर रिपब्लिक आयएएस अकादमीचे श्री मंगेश जोग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या परीक्षांमधील मूलभूत फरक, पदवीच्या काळात या परीक्षांसाठी अभ्यास करण्याचा रोडमॅप आणि अभ्यासाची रणनीती आणि संदर्भित केले जाणारे मूलभूत संदर्भ साहित्य या विषयांवर श्री जोग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, आवांतर वाचन व चालू घडामोडीची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यानी सांगितले.
यावेळी डीन स्टुडन्ट अफेअर डॉ. आर. ए. पाटील, उच्च शिक्षण क्लबच्या समन्वयक प्रा. शोभा पाटील, इव्हेंट ऑर्गनायझर प्रा.निराली गिलबिले व स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. मनजीत जाधव उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतूराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन
|