बातम्या
डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित
By nisha patil - 11/4/2024 3:31:58 PM
Share This News:
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्याच्या हेतूने डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाने एक मोठे पाऊल उचलत रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब अंतर्गत सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित केला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
सदर रोबो विविध उपकरणांनी सुसज्जित आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक, मेकॅनिकल अश्या विविध प्रकारचे ग्रिपर्स समाविष्ट आहेत. तसेच या रोबोद्वारे 24 विविध इंडस्ट्रिअल ऑपरेशन्स करता येतात.
या प्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष मा. डॉ. संजय डी. पाटील म्हणाले की या रोबो मुळे मेकॅनिकल विभागासह इतर सर्व विभागातील विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात फायदा होईल.
ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल गुप्ता म्हणाले विद्यार्थ्यांना काळानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची चांगल्या प्रकारे ओळख होण्यासाठी व इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी या रोबोचा निश्चित उपयोग होईल.
मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर म्हणाले, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर करण्यासाठी हा रोबो मोलाचा वाटा उचलेल.
यावेळी राजविमल इंजिनिअरिंग वर्क्स पुणेचे दीपक देसाई व संतोष गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबचे समन्वयक प्रा. पंकज नंदगावे व प्रा. विनय काळे उपस्थित होते.
डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित
|