बातम्या
डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये आयडिया थॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
By nisha patil - 3/23/2024 5:47:02 PM
Share This News:
कोल्हापूर डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे पश्चिम महाराष्ट्रीय स्तरावरील आयडिया सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
नेत्रा इंक्युपेशन सेंटर, आर आय टी, साखराळे यांच्या संयोजना खाली कोल्हापूर विभागासाठी आयोजित या स्पर्धेत उत्कृष्ट अशा दहा संकल्पना व स्टार्टअपचे सादरीकरण झाले. या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीमध्ये जवळपास 200 हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमधील आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना तसेच स्टार्टअप औद्योगिक विश्व व शैक्षणिक क्षेत्रामधील तज्ञांसमोर सादर केले. या कल्पना व स्टार्ट यांचं नाविन्य विशद करून त्यांची उद्योग विश्व व समाजासाठी असणारे महत्त्व व यामुळे होणारी बचत, प्रोटो टाईप स्लाईड शो द्वारे तज्ञां समोर मांडली.
यातील बऱ्याच संकल्पना या आंतर शाखीय संशोधनाला चालना देणाऱ्या व नाविन्यपूर्ण होत्या. या सर्व संकल्पनेची सादरीकरण उद्योग विश्वातील तज्ञ सर्वोत्तम ऊर्जाचे संचालक दीपक पाटील, उद्योजक धीरज पाटील व नेत्रा आर.आय.टीचे इंनक्युबॅशन मॅनेजर सचिनद्र कांबळे, व महाविद्यालयाचे अधिष्ठाता संशोधन डॉ अमरसिंह जाधव यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या संशोधन विभागा बरोबरच डॉ. प्रशांत जगताप, डॉ सुप्रिया पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी शिवराज भांदेगिरे, सुदेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य संतोष चेडे, रजिस्टर डॉ लितेश मालदे तसेच राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूरचे चे संचालक ड्रॉ. पी. व्ही.कडोले, संचालक आर आय टी, नेत्रा इंक्युबॅशन सेंटर सीईओ हर्षल पाटील, अधिष्ठाता डॉ. आनंद काकडे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये आयडिया थॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
|